इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव विभागाच्या वतीने क्लब रोडवरील बीम्स रुग्णालयाच्या कार्यालय परिसरात रोपे लावून वन महोत्सव साजरा करण्यात आला.
क्लब रोडवरील बीम्स रुग्णालय कार्यालय परिसरात डॉ.रवींद्र अनगोळ यांनी रोपे लावून कार्यक्रमाची सुरुवात केली.

सचिव डॉ.सुश्रुत कामोजी, डॉ.राजश्री अनगोळ , डॉ.देवगौडा व्यासपीठावर होते.
बेळगाव शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पर्यावरण दिनाचा एक भाग म्हणून रोपांची लागवड करण्यात आली. डॉ.रवींद्र अनगोळ म्हणाले की, निसर्गाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.


Recent Comments