आत्तापर्यंत शांत असलेले विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली असून आज माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा कुटुंबाविरोधात मौन बाळगून असणाऱ्या यत्नाळांनि आज पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर टीका करत लोकसभा निवडणुकीत येडियुराप्पानी काँग्रेससोबत युती केल्याचा दावा केला आहे.
यावेळी वीरशैव महासभेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी बी. एस. वाय. यांच्या नावाचे विश्लेषण करत बी म्हणजे भीमण्णा खंडरे. एस म्हणजे शिवशंकराप्पा आणि वाय म्हणजे येडियुरप्पा असे सांगत नवी व्याख्या दिली. या तिघांची मुले, भाची, नातवंडे आणि जावई राज्यात निवडणुकीला उभे राहतील, असे सांगून महासभेच्या इतर सदस्यांनी घरातील कचरा झाडण्याचे काम करावे असा टोला लगावला. या गटात गजकेसरी म्हणजेच मंत्री शिवानंद पाटील देखील सामील झाल्याचा दावा केला.


Recent Comments