Belagavi

रोटरी मेगा जॉब फेअर :41 हून अधिक कंपन्यांचा सहभाग

Share

रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावच्या वतीने , आज स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट लिमिटेडच्या सहकार्याने रोटरी मेगा जॉब फेअरचे आयोजन काण्यात आले होते.
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव तर्फे आज, शनिवारी स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी मेगा जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील बी.के. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत बेळगावसह बेंगळुरू, म्हैसूर, अहमदाबाद, पुणे, हुबळी, धारवाड येथील 41 विविध कंपन्यांनी भाग घेतला होता. फार्मा, टेक्सटाईल, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो मोबाईल, बँकिंग अशा विविध क्षेत्रात अनेकांना नोकऱ्या मिळाल्या.


शिवानंद पाटील यांनी इन न्यूजला याबाबत अधिक माहिती दिली.
रोजगार मेळाव्याला सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये 2000 हून अधिक नोकरी इच्छूकांनी सहभाग घेतला.

Tags: