महिलांना निर्भयपणे समाजात जगता यावे, यासाठी राज्यातील १०० ठिकाणी त्रिशूल दीक्षा देण्यात येणार असल्याचे श्रीरामसेना संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी सांगितले. आज बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लव्ह जिहाद रोखण्यासाठी श्रीरामसेनेने हेल्पलाइन सुरू केल्यापासून आतापर्यंत ५०० हून अधिक कॉल्स आले आहेत. त्यापैकी 100 हून अधिक फोन कॉल्स देश-विदेशातून आले आहेत. बलात्काराच्या 70 पीडितांचे फोन आले आहेत. नेहाच्या प्रकरणानंतर हुबळीतच 5 घटना घडल्या आहेत.

हिंदू महिलांचे रक्षण करणे हे श्री राम सेनेचे ध्येय आहे. आम्ही यापूर्वीच धारवाडमधील 50 महिलांना त्रिशूल प्रशिक्षण दिले आहे. महिलांना निर्भयपणे फिरण्याची हिंमत मिळाली आहे. त्रिशूल प्रशिक्षण घेण्यासाठी हजारो महिला पुढे आल्या आहेत. राज्यात 100 ठिकाणी त्रिशूल दीक्षा प्रशिक्षण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी श्रीरामसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments