Belagavi

जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांचे खाजगी रुग्णालयांवर छापे

Share

विजयपूर जिल्ह्यातील चडचण शहरातील विविध खाजगी रुग्णालये आणि नेत्र तपासणी केंद्रांवर विजयपूर जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी अचानक छापे टाकून रुग्णालयांची तपासणी केली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. बी. जी. हुब्बळ्ळी म्हणाले इंडी, चडचण, सिंदगी भागातील खाजगी रुग्णालयात स्त्री भ्रूण हत्या करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अशा पद्धतीच्या बातम्याही प्रसारमाध्यमांवर झळकत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध खाजगी रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यात येत आहे. मात्र तपासणीदरम्यान अशी कोणतीही रुग्णालये सापडलेली नाहीत. याच मोहिमेदरम्यान नेत्रतपासणी केंद्रांमध्येही तपासणी करण्यात आली. यादरम्यान बेकायदा नेत्र तपासणी मशिनरी आढळून आल्या असून संबंधित नेत्रतपासणी केंद्रातील नामफलक काढण्याची सूचना करण्यात आली आहे. हे काम असेच सुरु ठेवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. तालुक्यात आरएमपी डॉक्टरांची संख्या वाढत असल्याची माहिती आहे.
त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

Tags: