महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नुकतीच बंगळुरू उत्तर तालुक्यातील चिक्कबनावर येथील महिला आणि मुलांसाठी केंद्र आणि राज्य पुरस्कृत पोषण आहार तयार करणे आणि प्रशिक्षण केंद्राला भेट दिली आणि अंगणवाडी केंद्रांना पुरवल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेची पाहणी केली.

बुधवारी महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेंगळुरू उत्तर तालुक्यातील चिक्कबनवर येथे केंद्र आणि राज्य पुरस्कृत महिला आणि मुलांसाठी पोषण आहार तयार करणे आणि प्रशिक्षण केंद्राला भेट दिली आणि पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी केंद्रातील बालकांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची माहिती घेतली. कुठलीही कुचराई होणार नाही, यासाठी काळजीपूर्वक खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच प्रत्येक खाद्यपदार्थ तपासून माहिती दिली.
यावेळी विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.जी.सी.प्रकाश, ज्येष्ठ नागरिक विशेष गरज विभागाचे संचालक एन.सिद्धेश्वर, विशेष अधिकारी एन. एच. निश्चल, बंगळुरू शहर जिल्हा उपसंचालक सिद्दरामप्पा आदींचा सहभाग होता.


Recent Comments