Belagavi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 58 वा वर्धापन दिन

Share

बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवा सेना यांच्या वतीने पक्षाच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

बेळगावमधील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. 29, शाळा क्र. 20, शाळा क्र. 22 या तिन्ही मराठी शाळांना बेळगाव शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक साहित्याचे वितरण केले.

बेळगाव जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहरप्रमुख राजु तुडयेकर यांच्या हस्ते मुख्याध्यापक एल. एस जैनोजी (शाळा क्र. 22), सी. एन. एस. कुरबेट (शाळा क्र. 29), सी. एस. यु. कपिलेश्वरी (शाळा क्र. 20) यांच्याकडे शैक्षणिक साहित्य सुपुर्द केले. याप्रसंगी उपशहरप्रमुख प्रकाश राऊत, संघटक तानाजी पावशे, युवासेनेचे विनायक हुलजी, चेतन शिरोळकर, संकेत कड़गांवकर, संकेत कंगाळकर, सक्षम कंग्राळकर, गणेश गावडा, विठ्ठल हुंदरे, अमर कडगांवकर, अमृत शिरोडकर, प्रदिप सुतार तसेच तिन्ही शाळामधील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: