सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी, चिक्कोडी लोकसभा सदस्या प्रियांका जारकीहोळी यांनी बेळगाव शहरातील प्रसिद्ध डॉक्टर .गिरीश सोनवलकर यांच्या घरी जाऊन सन्मान स्वीकारला .
प्रियंका जारकीहोळी या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आणि पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आल्या. गिरीश सोनवलकर यांच्या घरी भेट दिल्यानंतर डॉ. गिरीश सोनवलकर दाम्पत्य व कुटुंबीयांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
दरम्यान, खासदार प्रियांका जारकीहोळी याना डॉ. गिरीश सोनवलकर यांची आई लक्ष्मी सोनवलकर यांचे आशीर्वाद लाभले. डॉ. गिरीश सोनवलकर यांच्या पत्नी डॉ.सविता सोनवलकर यांनी खासदार प्रियांका जारकीहोळी यांचे औक्षण करून स्वागत केले.
यावेळी सतीश शुगर्सचे संचालक, युवक काँग्रेसचे नेते राहुल जारकीहोळी यांच्यासह प्रसिद्ध डॉक्टर डॉ. गिरीश सोनवलकर यांचे बंधू संतोष सोनवलकर, प्रकाश सोनवलकर उपस्थित होते.


Recent Comments