भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
धनंजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला . यावेळी बोलताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले हा सत्कार माझा नाही संपूर्ण कार्यकर्त्यांचा आहे सगळ्यात जास्त लीड देऊन सर्व मतदारांनी मला निवडून दिले त्यांचा मी ऋणी आहे येणाऱ्या काळामध्ये बेळगाव एक चांगली सिटी म्हणून आम्ही बनवू . बेंगलोर नंतर बेळगाव चे नाव येईल असं ते म्हणाले .
त्यानंतर मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले सर्वप्रथम ग्रामीण मधल्या जिजाऊंच्या लेकींचे मनापासून आभार मानावे असे वाटते कारण पैशाला बळी न पडता हिंदुत्व आणि नरेंद्र मोदींना मतदान केले. बेळगाव ग्रामीण मधिल मराठासमाजातील .राजकिया क्षेत्रा मधे सक्रीय अस्लेल्या नेत्यांशी आम्ही बातचित केली. हया वेळी देश्यासाठी आम्हाला सहकार्या करा अशी. विनंती केली होती आणि मराठा समाजाने हिंदुत्वासाठी मतदान केले यासाठी मराठा समाजाचे. मनापासुन मी आभार मानतो असे ते म्हणाले .
हया प्रसंगी. माजी आमदार मनोहर कडोलकर,जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, भाजप नेते नागेश मन्नोळकर भाजप जेष्ठ नेते आर, एस, मुतालिक, बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील. आदींनी विचार मांडलें. कार्यक्रमाप्रसंगी यलेश कोलकार , उमेश पुरी, विना विजापूरे,राजू देसाई, गुलाप्पा होसमनी, महेश मोहिते, भाग्यश्री कोकितकर, प्रदीप पाटील. आधी उपस्थित होते.


Recent Comments