Belagavi

बेळगावच्या पूर्व भागात पेरणीसाठी लगबग सुरु

Share

यंदा पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावल्याने , शेतात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे . मशागत केलेल्या आपल्या जमिनीत आता शेतकऱ्यांनी पेरणीचे काम हाती घेतले आहे .

बेळगावच्या पूर्व भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे . यंदा पावसाने जूनच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार हजेरी लावल्याने , शेतीला पूरक असे वातावरण निर्माण झाले आहे . त्यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामांची लगबग सुरु झाली आहे . गेली वर्षी पावसाने हात दिल्याने , शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते . मात्र यंदा वरुण राजाची कृपादृष्टी अनुकूल असल्याने , बेळगावमधील पूर्व भागातील सांबरा , मुतगा , बसवनकुडची भागात पेरण्यांना सुरुवात झाली आहे . शेतकरी आपल्या बैलांसह नांगर जुंपून शेतीच्या कामात व्यस्त असलेले दिसूनयेत आहेत .

या संबंधी राजू पाटील या शेतकऱ्याने अधिक माहिती दिली .


एकंदर यंदा पावसाला सुरुवात तर चांगली झाली आहे . शेतकरी देखील आनंदित आहे . पुढेही वरुणराजाची कृपा अशीच राहू देत आणि पीक पाणी मुबलक होऊ देत अशी अशा करायला हरकत नाही .

Tags: