मिरज येथील सचिन हॉस्पिटलमध्ये मुल न झालेल्या दांपत्यासाठी व महिलांमधील आजार याविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मिरज येथील सचिन हॉस्पिटल या टेस्ट ट्युब बेबी सेंटर मध्ये मुल न झालेल्या दांपत्यासाठी व महिलांमधील आजार याविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांना वंध्यत्वाची कारणे, उपचार, व स्त्रीरोग यावर आधुनिक तंत्रज्ञान व उपचार यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. हॉस्पिटलमार्फत राबविलेल्या शिबिरामुळे असंख्य रुग्णांना लाभ झाला.
अपत्यहीन दांपत्यांच्या जीवनामध्ये नवसंजिवनी निर्माण करण्याचे व महिलांमधील आजारावर यशस्वी उपचार करण्याचे आदर्शवत कार्य हॉस्पिटलकडून घडत आहे. या हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञान एकाच छताखाली उपलब्ध आहे. यामुळे समाजातील विविध घटकांना याचा निश्चितच लाभ होईल. या हॉस्पीटलमध्ये उपलब्ध असलेल्या टेस्ट ट्युब बेबीची आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोगशाळा आहे. अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय तज्ञ डॉक्टरांची टीम असल्यामुळे वंध्यत्वातील उपचाराचा यशाचा आलेख जास्त आहे.
शिबिरामध्ये डॉ. सचिन सुगाणावर यांनी स्त्री व पुरुष वंध्यत्वाची कारणे व औषधोपचार व टेस्ट ट्यूब बेबी यासारख्या प्रगत तंत्रज्ञान व सामाजिक दृष्टीकोन याबद्दल मार्गदर्शन केले. विवाहपूर्व व विवाहनंतर समस्यांसाठी आधुनिक उपचार, वेगवेगळ्या प्रकारच्या संसर्गजन्य उपचार व मार्गदर्शन केले गेले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक डॉ. सचिन सुगाणावर यांनी केले. या शिबिरामध्ये मोफत तपासणी व औषधे देण्यात आली. सर्व शिबिरार्थीनी हॉस्पिटलमार्फत राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमाविषयी व प्रत्यक्षात हॉस्पिटलमधील उपलब्ध तंत्रज्ञान, आधुनिक मशिन व सुविधा याविषयी समाधान व्यक्त केले.


Recent Comments