Belagavi

बेळगावात आदित्य बिर्ला ओपस पेंट स्टोअरचे उद्घाटन

Share

प्रतिष्ठित आदित्य बिर्ला ग्रुपच्या बिर्ला ओपस पेंट शॉपचे कणबर्गी येथील अंजनेय नगर येथे उद्घाटन करण्यात आले.

बेळगावमध्ये प्रथमच स्थापन झालेल्या आदित्य बिर्ला ओपस आदित्य बिर्ला समूहातर्फे कणबर्गी रोडवरील अंजनेय नगर येथे नगरसेवक हनुमंत कोंगाळी यांच्या हस्ते आदित्य बिर्ला ओपस स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी इन न्यूजशी बोलताना दुकानाचे मालक प्रमोद रानके यांनी सांगितले की, आदित्य बिर्ला समूहाच्या पेंट शॉपचे उद्घाटन आज पार पडले असून कर्नाटकातील पहिले आदित्य बिर्ला ओपस कंपनीचे स्टोअर बेळगावमध्ये सुरु करण्यात आले आहे.

बिर्ला ओपस पेंट्सचे व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी म्हणाले की, आदित्य बिर्ला ग्रुप कंपनीने बिर्ला ओपस पेंट गॅलरी उघडली आहे, 10 लिटर पेंट खरेदीवर 1 लिटर मोफत पेंट अशी ऑफर देण्यात आली असून सवलतीच्या दरात दर्जात्मक आणि प्रदीर्घकाळ टिकणारा पेंट उपलब्ध आहे.

नगरसेवक हनुमंत कोंगाळी यांनी बिर्ला ओपस पेंट गॅलरीच्या भविष्यासाठी शुभेच्छा देताना व्यवसायाची अधिकाधिक प्रगती व्हावी, असे सांगितले.

यावेळी हनुमंत कोंगाळी, प्रादेशिक व्यवस्थापक सुनील, प्रशांत कुलकर्णी, डिझायनर मंजू प्रसाद, हर्षिता, चेतन आदी उपस्थित होते.

Tags: