गृहमंत्री जी परमेश्वर यांच्याहस्ते बेंगळुरू मध्ये अग्निशामक दलाचे कर्मचारी आनंद बसप्पन्नवर यांच्यासह सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
४ एप्रिल रोजी विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लच्यान गावात २५० फूट खोल विहिरीत पडलेल्या दोन वर्षीय चिमुरडीचा जीव अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी अविरतपणे २० तास प्रयत्न करून वाचविला होता. अग्निशामक दलाच्या या कारवाईत आनंद बसप्पन्नवर आणि सहकाऱ्यांनी मोठी कामगिरी केली होती. या कामगिरीचे कौतुक करत तात्काळ सेवा पोलीस विभागाचे महानिर्देशक कमल पंत यांच्याहस्ते त्यांना गौरविण्यात आले.


Recent Comments