हिंडलगा कारागृहातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आयपीएस अधिकारी अलोककुमार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कुख्यात गँगस्टर जयेश पुजारी याला कोर्टासमोर हजर करतेवेळी बेळगाव कोर्ट आवारात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
कुख्यात गँगस्टर जयेश पुजारी याला कोर्टासमोर हजर करतेवेळी त्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. आपला अर्ज न्यायालय स्वीकारत नसल्याच्या कारणावरून पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या जयेश पुजारी याला उपस्थित जनतेने आणि वकिलांनी मारहाण केली. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप यावेळी जयेश पुजारीने केला. यावेळी ताबडतोब एपीएमसी पोलिसांनी हस्तक्षेप करत आरोपी जयेश पुजारील अटक करून त्याची रवानगी एपीएमसी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.


Recent Comments