बेळगावच्या केएलएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
केएलएस आयएमईआरचे संचालक डॉ. आरिफ शेख यांच्या प्रातविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी योगाचे महत्व पटवून दिले. प्रसिद्ध न्यूरोसर्जन आणि योग डॉ. प्रशांत कटकोळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. कटकोळ यांनी योगाभ्यासाच्या शरीर आणि मन यांच्यातील गहन संबंधावर प्रकाश टाकला तसेच मानसिक आणि शारीरिक सुसंवाद वाढवण्याच्या भूमिकेवर जोर दिला.
डॉ. जॉर्ज रॉड्रिग्स, मुरलीधर प्रभू, सुनील कुलकर्णी, अमोल नाईक, आणि विश्वनाथ यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने हा कार्यक्रम अतिशय काटेकोरपणे पार पडला. योगाचे खरे सार आणि फायदे या कार्यक्रमांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले. या स्पर्धेत सुमारे १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.


Recent Comments