महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या विभागाची प्रगती आढावा बैठक घेतली. मंगळवारी विधानसौध येथे झालेल्या बैठकीत त्यांनी 2024-25 या वर्षातील कार्यक्रम व कृती आराखड्याची माहिती घेतली.
सन 2024-25 च्या अनुदान वाटपासहित एकात्मिक बाल विकास योजना, महिला सक्षमीकरण योजना, महिला कल्याण, बालकल्याण, गृहलक्ष्मी यासह विविध योजनांच्या प्रगतीची माहिती घेऊन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला एम.आर रविकुमार, अपंग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण विभागाचे संचालक एन. सिद्धेश्वर, वरिष्ठ अधिकारी पुष्पा रायकर, मैत्री, बसवराजू, मंत्र्यांचे खाजगी सचिव डॉ. विश्वनाथ, विशेष कर्तव्य अधिकारी निश्चल बीएच आदी उपस्थित होते.


Recent Comments