Belagavi

घरपट्टी भरण्यासाठी पाच टक्के सवलतीचा आदेश

Share

शहरातील मालमत्ताधारकांना सरकारने पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला असून घरपट्टी भरणाऱ्यांना दि. 31 जुलै 2024 पर्यंत 5 टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे घरपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांतुन या निर्णयाचे स्वागत होत आहे.

व्हॉइस : बेळगाव महापालिकेतील मालमत्ता कर वसुलीबाबत महापालिका आयुक्त पी. लोकेश आणि महसूल निरीक्षक गुरुनाथ दड्डे यांच्या नेतृत्वाखाली बैठक बोलावण्यात आली होती.

शहरातील नागरिकांनी आणखी एक महिना सवलत वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत सरकारकडून तशा आदेशाचे पत्र महानगरपालिकेला आले आहे. एप्रिल महिन्यामध्ये घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना दरवर्षी 5 टक्के सवलत दिली जाते. यावर्षीही ही सवलत लागू होती. मात्र चलन वेळेत मिळत नव्हते. याचबरोबर ऑनलाईन समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे त्या सवलतीचा काही दिवसच लाभ मिळाला. बेळगाव शहर अधिक विकसित, स्वच्छ व सुंदर करण्यासाठी मालमत्ताधारकांनी त्याचा लाभ घेऊन कर भरावा, असे आवाहन बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त पी. लोकेश यांनी केले आहे.

2023-2024 या कालावधीतही महापालिकेने 30.61 टक्के कर वसूल केला आहे. 7 कोटी 42 लाख गतवेळची देय रक्कम रु. यावेळी महापालिकेने 73 कोटी करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. 80 कोटी 92 लाख अपेक्षित होते. एप्रिल, मे आणि 10 जूनपर्यंत 29.91 कोटी जमा झाले असून 50 कोटींची थकबाकी आहे. एकूण 36 टक्के कर जमा झाला. ऑनलाइन किंवा बेळगाव वनच्या माध्यमातून कर भरता येईल, असे महसूल निरीक्षक गुरुनाथ दड्डे यांनी सांगितले.

या बैठकीला बेळगाव महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सरकारने जुलै अखेरपर्यंत ही सवलत दिली आहे. गेल्या मे महिन्यामध्ये तसेच आतापर्यंत भरलेल्या करदात्यांना पाच टक्के सवलत मिळणार का? याचा उल्लेख या आदेशामध्ये देण्यात आला नाही. त्यामुळे आता त्या आदेशाकडेही साऱ्यांचे लक्ष लागून आहे. याचबरोबर महानगरपालिका आयुक्त कोणता निर्णय घेणार? हे पहावे लागणार आहे.

Tags: