अपघाताच्या घटनांसह वाहतूक नियमभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर धारवाड वाहतूक स्थानकाने विद्यार्थ्यांमध्ये रस्ता वाहतूक आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती केली आहे.
हुबळी धारवाड पोलीस आयुक्तालय आणि धारवाड वाहतूक पोलीस स्टेशनच्या वतीने बासेल मिशन स्कूलच्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जाणीव करून दिली.
सीपीआय निवास मेटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, अलीकडच्या काळात युवा समाज अधिकाधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहे. समाजाचा एक घटक म्हणून कायद्याचा आदर करून प्रत्येकाने जबाबदाने वागावे, तरुणांनी दुचाकी वापराबाबत सजग राहावे, असा सल्ला दिला.


Recent Comments