विजयपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत दमदार पाऊस झाला असून इंडी, सिंदगी, देवरहिप्परगी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
विजयपूर जिल्ह्यात उत्कृष्ट पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या ठिकाणांमध्ये इंडी, सिंदगी, देवरहिप्परगी तालुक्यांचा समावेश असून इंडी तालुक्यातील निंबाळ के. डी. येथे १२८ मि.मी., सिंदगी तालुक्यातील ब्याकोड येथे ११६ मि. मी., देवरहिप्परगी तालुक्यातील मुळसावळगी येथे ११७.०५ मि. मी. पावसाची नोंद तर चडचण तालुक्यात ७८.५० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख कक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजयपूर जिल्ह्यात येत्या काही दिवसांतही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.


Recent Comments