Belagavi

बेळगावात जैन समाजाच्या वतीने श्रुतपंचमी साजरी

Share

ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी जैन समाजाच्यावतीने साजरी करण्यात येणारी श्रुतिपंचमी बेळगावमध्ये सरस्वती आणि विद्याप्राप्ती विधानानुसार साजरी करण्यात आली.

बेळगावमधील धर्मनाथ भवन येथे मंगळवारी श्रुतीपंचमीनिमित्त सरस्वती विधी व विद्याप्राप्ती प्रक्रिया पार पडली. वृषभ उपाध्याय, दर्शन उपाध्याय, प्रकाश मुगन्नवर, जलतकुमार पुनजगौडा, सुभाष आडके, पद्मन शेट्टी, यल्लप्पा देसाई, शांतीनाथ कुडची, पुष्पक हणमन्नवर, जीनागोंडा आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

जैन समाजात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पहिला जैन धर्मग्रंथ लिहिला गेला. भगवान महावीरांनी दिलेले ज्ञान अनेक आचार्यांनी श्रुत परंपरेने जिवंत ठेवले. या दिवशी जैन धर्माचे अनुयायी पिवळी वस्त्रे परिधान करून आणि जिनावानी मिरवणूक काढून सण साजरा करतात, तसेच अप्रकाशित दुर्मिळ ग्रंथ प्रकाशित करण्याच्या उद्देशाने समाजातील लोक जमेल तसे दान देऊन ही परंपरा पाळतात. बनवासी, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये जीनवाणीचे जतन आणि प्रसारण सुरू झाले. अशी माहिती जलतकुमार पुनजगौड यांनी इन न्यूजशी बोलताना दिली.()

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संमत महिला मंडळ, धर्मनाथ श्रावक संघ, दक्षिण भारत जैन संघ, जैन मिलन, माणिकबाग, जैन बोर्डिंगच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Tags: