बेंगळुरूच्या होसहळ्ळी येथील नम्म मेट्रो मार्गावरील मेट्रोस्थानकानजीक ट्रॅकवर उडी मारून तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
मेट्रो ट्रेनच्या ट्रॅकवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रात्री 8.56 वाजता बेंगळुरू येथील नम्म मेट्रो मार्गावरील मेट्रोस्थानकानजीक घडली आहे. मेट्रो ट्रॅकवर उडी मारलेल्या तरुणाला सुखरूपपणे बाजूला काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हैसूर रोड स्टेशन ते चल्लागट्टा, मॅजेस्टिक स्टेशन ते व्हाईट फील्ड दरम्यान धावणाऱ्या मेट्रो ट्रॅक वर हा प्रकार घडला असून या घटनेमुळे म्हैसूर रोड मेट्रो स्टेशन ते मॅजेस्टिक दरम्यान वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी अडकून पडले.


Recent Comments