कृष्णा नदीच्या संततधार पावसामुळे विजयपूर जिल्ह्यातील अलमट्टी जलाशयात पाण्याची आवक वाढली आहे.
दिवसेंदिवस, अलमट्टी जलाशयात पाण्याची आवक वाढत चालली असून आज 21,251 क्युसेकची आवक नोंदवण्यात आली आहे. अवघ्या तीन दिवसांत अल्लमट्टी जलाशयातील पाणीसाठा वाढला आहे. कालपर्यंत २१.६७४ टीएमसी पाणीसाठा होता. आज 23,471 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या जूनमध्ये आवक नव्हती. यंदा जून महिन्यातच पाणीसाठ्याचे प्रमाण वाढले असून कृष्णा नदीतीरावरील शेतकरी सुखावले आहेत.


Recent Comments