award

भारत विकास परिषदेकडून दहावी आणि बारावीच्या गणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Share

भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या बोर्ड परिक्षेत बेळगाव शहरात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कारांतर्गत शिष्यवृत्ती देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ शिक्षण अधिकारी आय. डी. हिरेमठ व बेळगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष व्ही. एन. जोशी उपस्थित होते.
. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

मराठी माध्यमात शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रेरणा प्रकाश पाटील (मराठी विद्यानिकेतन), इंग्रजी माध्यमात तनिषा शंकर नावगेकर ( सेंट मेरी हायस्कूल) व कन्नड माध्यमात संपदा विवेक सुतार (गोमटेश हायस्कूल), त्याचप्रमाणे बारावीच्या परीक्षेतून विज्ञान विभागात सर्वप्रथम आलेल्या ओम संदीप कुलकर्णी (जी. एस्. एस्. कॉलेज), वाणिज्य विभागात रोहिणी युवराजसिंग राजपूत ( गोगटे कॉलेज) व कला विभागात पारुल अनिरुद्ध हुन्नरगीकर ( लिंगराज कॉलेज) यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास डी. वाय. पाटील, सुभाष मिराशी, रामचंद्र तिगडी, कुमार पाटील, गणपती भुजगुरव, पी.एम्. पाटील, उषा देशपांडे, शुभांगी मिराशी, प्रिया पाटील, ज्योती प्रभू, शालिनी नायक आदि उपस्थित होते.

Tags: