Belagavi

मंत्री आर. बी. तिम्मापूर यांची बेळगावला भेट

Share

 

बेळगावदौऱ्यावर आलेले मंत्री आर. बी. तिम्मापूर यांची मादिग समाजातील गोकाक आणि बेळगावमधील आरक्षण संघर्ष समितीच्या नेत्यांनी भेट घेतली.

ज्येष्ठ साहित्यिक सरजू काटकर यांच्या कादंबरीवर आधारित सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावा, या मागणीचे निवेदन बेळगाव शहराच्या दौऱ्यावर असलेले अबकारी मंत्री आर. बी. तीम्मापुर यांना बेळगाव आणि गोकाक मादिग आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आले.

यावेळी यल्लाप्पा हुदली, शंकर दोडमनी, बसवराज उप्पारट्टी. यमनाप्पा रत्नकर, संदीप कोलकार आदी उपस्थित होते.

Tags: