केईएलई संस्थेच्या पदवीपूर्व कॉलेजची विद्यार्थिनी प्रदीपा हल्लूर हिने NEET परीक्षेत ६४७ गुण मिळवले. केएलई संस्थेने त्यांना शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहन दिल्याचे केएलईचे संचालक महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले.
व्हॉइस ओव्हर : केईएलई संस्थेच्या आर एल एस पदवीपूर्व कॉलेजमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले कि , . या वर्षी केईएलई संस्थेच्या 31 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत 600 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.74 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी , 500 पेक्षा जास्त गुण मिळवले तसेच, सीईटी परीक्षेतही ५०० पेक्षा कमी रँक मिळालेले ३८ विद्यार्थी आहेत, असेही ते म्हणाले.
आजकाल शिक्षणात बरेच बदल झाले आहेत. पारंपारिक शिक्षण दूर होत चालले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये बरेच बदल झाले आहेत. नवीन अभ्यासक्रम उदयास येत आहेत. ते म्हणाले की, स्पर्धात्मक युगात शिक्षण घेणे हे विद्यार्थ्यांचे ध्येय बनत आहे.
ते म्हणाले की, ग्रामीण भागातील हुशार गरीब मुलांना सरकारने नीट आणि सीईटी परीक्षांचे मोफत प्रशिक्षण द्यावे.
केएलईचे संचालक जयनंद मुनवल्ली आदी उपस्थित होते.


Recent Comments