विजयपूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. काल रात्री दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने मध्यरात्रीपर्यंत शहराला झोडपले .
रात्रभर पडलेल्या पावसामुळे अनेकांचे हाल झाले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे विजयपूर शहरातील इब्राहिम नगरात पावसाचे पाणी घरात शिरले.
घरात पाणी शिरल्याने लोकांचे हाल झाले आहेत. तसेच घरातील विविध वस्तू पाण्याने भिजून खराब झाल्या . याआधी स्थानिकांनी महापालिकेकडे ड्रेनेजची योग्य व्यवस्था करण्याचे आवाहन केले होते.


Recent Comments