जमिनीच्या मालकीच्या वादातून एका व्यक्तीचा चाकूने खून केल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नालतवाड गावात घडली.
नालतवाड गावातील बाळाप्पा अमरप्पा क्षत्री (४७) यांचा खून करण्यात आला. मुद्देबिहाळ पोलिसांनी सांगितले की, त्याच्या भावाचा मुलगा अडप्पा परसप्पा क्षत्री आणि इतरांनी बाळाप्पाची हत्या केली. जमिनीच्या वादावरून या लोकांमध्ये पूर्ववैमनस्य होते . काम करत असताना झालेला वाद वाढल्याने अडप्पा क्षत्री याने बाळाप्पाची चाकूने हत्या करून तेथून पळ काढला. मुद्देबिहाळ पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली.


Recent Comments