बेळगाव हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून खोट्या प्रचारामुळे लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मुलाचा पराभव झाल्याची टीका माजी खासदार मंगला अंगडी यांनी केली आहे.
बेळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सर्वप्रथम जनतेचे आभार मानले. जितकी मते दिवंगत सुरेश अंगडी यांना मिळाली तितकीच मते जगदीश शेट्टर यांना मिळाली असून बेळगाव हा भाजपचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे त्या म्हणाल्या.
बेळगावमध्ये ज्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व लक्ष्मी हेब्बाळकर करतात त्याच मतदार संघातील जनतेने त्यांना धडा शिकविला. खोट्या प्रचारामुळे लक्ष्मी हेब्बाळकरांच्या मुलाचा पराभव झाला असून लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अहंकाराचाही पराभव झाल्याची टीका मंगला अंगडी यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला मिळालेल्या कमी जागांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र केंद्रात एनडीएचे सरकार येण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे पाठिंबा देतील, जगदीश शेट्टर यांना केंद्रीय मंत्रिपद मिळेल, असा विश्वास मंगला अंगडी यांनी व्यक्त केला


Recent Comments