Vijayapura

मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री : अन्न निरीक्षकांकडून छापा

Share

विजयपूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील अनेक दुकानांवर अन्न निरीक्षकांनी छापे टाकून मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानमालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

मुदतबाह्य झालेल्या खाद्यपदार्थांची विजयपूर बसस्थानक परिसरातील दुकानांमध्ये विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आल्याने विजयपूर शहर पोलीस अन्न निरीक्षकांनी या भागातील दुकानांवर छापे टाकून विविध दुकानातील मुदतबाह्य खाद्यपदार्थांची पाकिटे जप्त केली आहेत. तसेच या भागातील अनेक दुकानांना नोटीस बजावण्यात आली असून दुकानांमध्ये स्वच्छता राखण्यासंदर्भातही कडक इशारा देण्यात आला आहे

Tags: