विजयपूर मधील मनगुळी अगसी येथील डॉ. बी.आर. आंबेडकर भवनच्या बांधकामासंदर्भात डॉ.बी.आर.आंबेडकर युवक संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या धरणे आंदोलनाचे १५ दिवस पूर्ण झाले असून अद्याप या मागणीकडे विजयपूर जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
सदर आंदोलनासंदर्भात अधिक माहिती देताना दलित नेते परशुराम सिद्धार्डी म्हणाले की, गेल्या 15 दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यातील दलित समाज विजयापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उधरणे आंदोलन करत आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने आंबेडकर भवनाची जागा न घेता निष्काळजीपणा दाखवला असून या प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाहावे असे आवाहन त्यांनी केले. ()
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीशैला काखंडकी, रवी काखंडकी, बाबू शिवशरण, राजू काखंडकी, प्रदीपा चलवादि, बसवराज कुबकड्डी, शेखु कूडगी, सुनिल कखंडकी, कृष्णा चलवादि, आकाश कांबळे, सचिन काखंडकी, प्रताप चिक्कलकी, आकाश काखंडकी, आकांक्षा काखंडकी, प्रताप चलवादी, सनी काखंडकी, प्रीतम काखंडकी, राजरतन कांबळे, मुदुकू वालिकार आदी उपस्थित होते.


Recent Comments