Belagavi

गरीब महिलांना धान्य व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Share

पांगुळ गल्ली अश्वत्थामा मंदिर पंच मंडळी यांच्या वतीने गरीब महिलांना धान्य व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले व्हॉइस शहरातील पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिर पंच मंडळी यांच्या वतीने गल्लीमधील गरीब महिलांना धान्याचे किट व पहिली ते महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनींना नोटबुक वितरण करण्यात आले. हा समारंभ अश्वत्थामा मंदिराच्या हॉलमध्ये करण्यात आला.

यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गणेश टेक्स्टाईल चे संचालक आकाश सिंघानीं व माजी उपमहापौर मीना वाझ हे उपस्थित होते या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन पंच मल्हारी कुऱ्हाडे यांनी स्वागत केले. गेली तीस वर्षे सातत्याने लहान गरजू मुलांना वह्या वाटप करण्यात येत असतात तर यावेळी गल्लीतील दहा गरीब महिलांना व 40 शालेय विद्यार्थ्यांना तसेच शाळा क्रमांक दोन येथे 15 मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी गल्लीतील पंच अरुण मुतकेकर, सतीश अनगोळकर, किरण कावळे, गजानन कावळे , अनंत कुचेकर, गजानन रांगणेकर , अशोक राजबाचे , नितीन रांगणेकर व इतर गल्लीतील नागरिक , मुले तसेच महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

Tags: