Belagavi

आरपीडी महाविद्यालय मतमोजणी केंद्रांवर जय्यत तयारी

Share

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. ४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून, त्यासाठी बेळगावातील मतमोजणी केंद्रांवर सर्व तयारी करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी स्ट्राँग रूमची पाहणी केली.
बदललेल्या राजकीय वातावरणात बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीने यावेळी चांगलीच उत्सुकता निर्माण केली असून, लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर आणि भाजपचे जगदीश शेट्टर यांच्यातील लढतीचा निकाल उद्या पाहायला मिळणार आहे .
आरपीडी कॉलेजच्या आजूबाजूला अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, मतमोजणी केंद्राच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी 4 ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे . शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, 5 केएसआरपी पथके, 300 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

बेळगाव निवडणूक अधिकारी तसेच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्ट्राँग रूमची पाहणी केली

105 संवेदनशील भागात सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनी सांगितले. केएसआरपीच्या 5 तुकड्या, 300 होमगार्ड नेमण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मतमोजणी केंद्रासहित परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत . तसेच ४ ड्रोन कॅमेऱ्यांची नजर सतत मतमोजणी परिसरावर राहणार आहे .

Tags: