१९५० सालापासून बेळगाव शहरात अनेक ऐतिहासिक आठवणींचा ठेवा जपणाऱ्या सरदार्स हायस्कुलमध्ये ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली.
अनेक विषयांवरील उत्तमोत्तम पुस्तके असूनही ग्रंथालय नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. हि बाब लक्षात घेत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शाळेत सुसज्ज असे ग्रंथलय स्थापन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण पुस्तकांची पर्वणी मिळणार आहे.
या शाळेचे माजी विद्यार्थी दिवंगत वैद्य पुरुषोत्तम अरळीकट्टी यांच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी डॉ. विद्या अरळीकट्टी यांनी १ लाख १३ हजारांची देणगी देत या ग्रंथालयाच्या स्थापनेचा शुभारंभ केला. अनेक माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून या शाळेत उत्तम ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली असून कन्नड, मराठी आणि उर्दू माध्यमातील ६०० विद्यार्थ्यांना हे ग्रंथालय फायदेशीर ठरणार आहे.

या शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सहाना मुरगोड या विद्यार्थिनीने आपल्या शाळेत स्थापन करण्यात आलेल्या ग्रंथालयाबद्दल आनंद व्यक्त केला असून पाठ्यपुस्तकांसोबतच इतर विषयांचे ज्ञान आता मिळविणे सोपे जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.
शाळेचे मुख्याध्यापक शिवशंकर हादिमनी यासंदर्भात बोलताना म्हणाले, ऐतिहासिक महत्व असलेल्या या शाळेत ग्रंथालयाची कमी होती. डॉ. विद्या अरळीकट्टी यांच्या पुढाकारातून शाळेला सुसज्ज ग्रंथालय मिळाले असून याचा या शाळेतील विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल, असे ते म्हणाले.


Recent Comments