Belagavi

चारा बँक सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांची निदर्शने

Share

बेळगाव जिल्ह्यातील चारा बँकेवर दिवसेंदिवस दबाव वाढत आहे. आणखी 2 ते 3 महिने चारा बँक सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली आणि शेतकऱ्यांनी आणखी २ ते ३ महिने चारा बँक सुरू करण्याचा आग्रह धरला.

शेतकरी नेते चुनाप्पा पुजारी म्हणाले की, बेळगाव जिल्हा प्रशासनाने चार दिवसांपासून चारा बँक बंद ठेवली आहे . अतिवृष्टीमुळे चारा बँक बंद असून, शेतकरी अडचणीत आला आहे, सलग पाऊस सुरु होईपर्यंत सरकारनी अजून २ ते ३ महिने चारा बँक सुरु ठेवावी अशी मागणी त्यांनी केली.
एम.के हुबळी येथील शासकीय रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, एमके हुबळी शहरातील मुलींच्या शासकीय शाळेचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही, शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी मदत मिळालेली नाही, असा संताप यांनी व्यक्त केला.

या आंदोलनात चुनप्पा पुजारी, शशिकांत पडसलगी, सुरेश परगन्नावार, राजू पवार, महेश सुबेदारा, कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे किशन नंदी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

Tags: