Belagavi

महिलांनी हाडांचे आरोग्य राखावे : डॉ. आय. देवगौड

Share

 

महिलांनी आपल्या हाडांचे आरोग्य चांगले ठेवावे, ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हाडांचे आरोग्य जपावे असे आवाहन डॉ. आय. देवगौड यांनी केले.

बुधवारी बेळगावमधील मराठा लाईट इन्फ्रंट्री रेजिमेंटल सेंटरच्या ज्युनियर लीडर्स विंग मध्ये स्पोर्ट इन्जुरीस हेल्थ संदर्भात आयोजित शिबिरात ते बोलत होते.

हार्मोनल असंतुलनामुळे स्त्रियांना रजोनिवृत्ती दरम्यान इतर अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. मध्यमवयीन महिलांना हार्मोनल असंतुलन दरम्यान वेदनादायक त्रास होतात. यामुळे पुढे ऑस्टिओपोरोसिससारखे गंभीर आजार होऊ शकतात. मानसिक ताण, पुरेशा सूर्यप्रकाशाचा अभाव, गुणवत्तापूर्ण अन्नाच्या सेवनाचा अभाव , निद्रानाश, जीवनशैली यामुळेही अनेक समस्या उद्भवतात. या आजाराचे लवकर निदान न झाल्यास व योग्य उपचार न केल्यास हाडांची सूज, फ्रॅक्चर, , कुष्ठरोग, संधिवात असे आजार दिसून येतात. त्यासाठी महिलांनी वर्षातून एकदा तरी त्यांच्या हाडांच्या खनिज घनतेची तपासणी करून घ्यावी असे आवाहन डॉ. आय देवगौड यांनी केले.

पुरेशा प्रमाणात कॅल्शियमचे सेवन, दररोज चालणे आणि व्यायाम करणे, तणाव व्यवस्थापन करून जीवनशैली राखणे आवश्यक आहे. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया, ज्यांना हाडांच्या अधिक समस्या आहेत, त्यांनी वर्षातून किमान दोन महिने व्हिटॅमिन डी3 आणि कॅल्शियम पूरक आहार घ्यावा, अशी माहितीही डॉ. आय देवगौड यांनी दिली.

यावेळी विंग कमांडर आर.एस.गुरया यांनी डॉ.देव गौडा यांचा गौरव केला. यावेळी लष्कर अधिकारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: