विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील शिरशाड गावात पोलिसांनी अवैध तांदूळ साठा केलेल्या अड्ड्यावर छापा टाकून लाखो रुपयांचा अन्नभाग्य तांदूळ जप्त केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी हणमंतरायगौड पाटील नामक आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून शिरशाड गावातील एका शेतातील शेडमध्ये अन्नभाग्य योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या तांदळाची बेकायदेशीरपणे साठवणूक केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या कारवाईत पोलिसांनी छापा टाकून १,८९,२९० रुपये किमतीचा ८२३० पोती किलो तांदूळ जप्त केला असून पोलिसांनी तांदुळसाठा, वाहनासह आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments