शहराच्या मध्यवर्ती भागातील गोवावेस परिसरात रस्त्याच्या मध्यभागी पडलेली धोकादायक चर मुजविण्यास प्रारंभ झाला असून नागरीकातून याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
गोवावेस जलतरण तलावासमोरील रस्त्यावर मध्यभागी धोकादायक चर निर्माण झाली होती. यामुळे याठिकाणी अपघात घडण्याची शक्यता होती. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना कसरत करावी लागत होती. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी या भागातील आमदार अभय पाटील यांच्याकडे निवेदन करून सदर चर मुजवून तातडीने रस्त्याची डागडुजी करण्याची विनंती केली होती. नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत आमदार अभय पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनात हि बाब आणून देत सदर रस्त्याच्या समस्येवर तोडगा काढला असून रस्त्याच्या मध्यभागी पडलेली चर मुजविण्यात आली आहे. यामुळे नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी किरण मन्नीकेरी, अमित राऊत आदी उपस्थित होते.


Recent Comments