बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून रोजी टिळक वाडी येथील आरपीडी महाविद्यालयात आणि 4 जून रोजी चिक्कोडी शहरातील सीटीई संस्थेच्या आरडी पदवीपूर्व महाविद्यालयात होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
त्यादिवशी विजयोत्सव, एकमेकांवर रंग उधळणे, मिरवणुकांचे नियोजन यासह भांडणे आणि प्रक्षोभक घोषणाबाजी होण्याची शक्यता आहे . त्यामुळे ,पावित्र्य राखण्याच्या उद्देशाने बेळगाव, चिक्कोडी आणि उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील चन्नम्मन कित्तूर आणि खानापूर तालुक्यात , 3 जून रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते ते 5 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत सीआरपीसी 1973 च्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
तसेच मतदान केंद्रांपासून 200 मी. निवडणूक अधिकारी व कर्मचारी वगळता परिसरात ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यासही बंदी आहे. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments