Gadag

जीवाच्या हमीत ‘शक्ती’ कमी!

Share

 

काँग्रेस सरकारने लागू केलेल्या शक्ती योजनेच्या अंमलबजावणीमुळे परिवहन बससेवा कोलमडली आहे. महिलांच्या वाढत्या गर्दीमुळे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. गदग मध्ये सध्या बससेवेच्या कोलमडलेल्या नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या ४ दिवसात शाळांना प्रारंभ होणार असून या पार्श्वभूमीवर आतापासूनच परिवहन बसमध्ये गर्दीचे प्रमाण वाढत चालले आहे.

गदगमध्ये विद्यार्थ्यांची बसप्रवास करताना कसरत सुरु आहे. बसमध्ये झालेल्या तुडुंब गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बसच्या दारात थांबून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. एक पाय बसच्या दरात आणि एक पाय अधांतरी अशापद्धतीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना अनुचित प्रकार घडेल याची जाणीव असूनही होत असलेला प्रकार थांबविणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने सुरु केलेल्या शक्ती योजनेची अम्मलबजावणी योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे, असे मत जनतेतून व्यक्त होत आहे.

Tags: