संत निरंकारी मंडळ दिल्ली , शाखा बेळगाव व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
संत निरंकारी मंडळ दिल्ली शाखा बेळगाव व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने धोबीघाट जवळील संत निरंकारी भवन, बेळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मूत्रपिंड, यकृत, थायरॉईड, सीबीसी, बी.पी. शुगर , इतर आजारांवर कुशल डॉक्टरांकडून अत्यंत कमी दरात उपचार करण्यात आले . . या शिबिराबाबत आठवडाभरापूर्वी जनजागृती करण्यात आली. सुमारे दोनशे रुग्णांनी त्याचा लाभ घेतला. याबाबत बेळगाव शाखेचे समन्वयक शशी आनंदजी व वैजनाथ लासे यांनी इन न्यूजला माहिती दिली.
हुबळीचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. पुरुषोत्तम अरोरा यांनी इन न्यूजला याबाबत अधिक माहिती दिली. संत निरंकारी ट्रस्ट मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून जनसेवा करत आहे. बीपी, मधुमेह यांसारखे आजार होण्याआधी आरोग्य जपले पाहिजे. याबाबत जनजागृती करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनील आनंद, डॉ. सुमन अरोरा, डॉ. महेश खोत, डॉ.स्नेहल खोत, डॉ. शुभम कुमार, डॉ. आदित्य चव्हाण, डॉ. सुनीता गव्हाणे यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी राजू नागवडेकर, तुषार लेंका, गजानन गव्हाणे, दादा गावडे आदींनी परिश्रम घेतले.


Recent Comments