पावसाळ्यापूर्वी बेळगाव महानगर परिसरात साफसफाईचे काम सुरू झाले असून, नाल्यांमध्ये पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जावे यासाठी सफाई कर्मचारी नाल्याची स्वच्छता करीत आहेत .
पावसाचे पाणी ज्या नाल्यात वाहून जाते, त्या नाल्यात झाडेझुडपे उगवली आहेत, माती व दगड नाल्यात पडले आहेत. तसेच अनेक ठिकाणी नाले कचऱ्याने तुडुंब भरले असून त्यामुळे पाणी सुरळीत वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे.
त्यामुळे 12 मे पासून बेळगाव महानगरपालिका शास्त्रीनगर शिवाजी गार्डन, ओम नगर कपिलेश्वर कॉलनी येथील नाल्यात साठलेला कचरा व झाडे साफ करत आहे.
नगरसेवक राजू भातकांडे म्हणाले की, पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे, पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, तसेच स्थानिक आ. अभय पाटील यांनी कालवे स्वच्छतेसाठी सहकार्य केले आहे.


Recent Comments