बेळगाव मधील महावीर भवन समोरील पेट्रोल पंपाजवळील शेडला अचानक आग लागल्याने काही काळ गोंधळ उडाला होता.
बेळगावच्या मध्यवर्ती भागातील गोवावेस येथील महावीर भवनजवळील पेट्रोल पंप नजीकच्या शेडला शनिवारी अचानक आग लागल्याचा प्रकार घडला. काही वेळातच या शेडने मोठा पेट घेतल्याने स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली.


Recent Comments