27 मे रोजी काहेरच्या 14 व्या दीक्षांत समारंभात 1739 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे केएलईचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले .
ते आज शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. काहेरचा 14 वा दीक्षांत समारंभ 27 मे रोजी होणार आहे. या
दीक्षांत सोहळ्यात आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर आणि राज्यपाल थावरचंद गेहलोत सहभागी होणार आहेत .
यावेळी पहिल्यांदाच एका अमेरिकन नागरिकाला काहेर कडून डॉक्टरेट प्रदान करण्यात येत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेचे रिचर्ड डरमन हे गेल्या 27 वर्षांपासून केएलई सोबत काम करत आहेत आणि अनेक विषयांवर संशोधन करत आहेत. आपला देश असा आहे जिथे नवजात मुलांमध्ये अशक्तपणा अधिक आढळतो. यावर त्यांनी संशोधन केले आहे. यावेळी 1739 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येत आहे. 45 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, 30 पीएच.डी., 13 सुपर स्पेशालिटी, 644 पदव्युत्तर, 1023 अंडर ग्रॅज्युएट, 4 डिप्लोमा फेलोशिप, 11 सर्टिफिकेट कोर्स आणि 5 जणांना पदवी प्रदान करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.


Recent Comments