बेळगावमधील सिद्धरामेश्वर शिक्षण संस्था एस.जी. बाळेकुंद्री टेक्निकल कॉलेजचा वर्धापन दिन येत्या २३ मे रोजी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे.
एस.जी. बाळेकुंद्री महाविद्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सव तसेच ब्लिस २०२४ या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या मैदानावर प्रसिद्ध पार्श्वगायक डॉ. विजयप्रकाश यांचा संगीत कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. पटगुंदी यांनी दिली.
महाविद्यालयाच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसीय आयोजित कार्यक्रम गदग तोंटदर्य मठाचे जगद्गुरु सिद्धराम महास्वामीजी आणि नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लम प्रभू महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक आयर्नचे सह व्यवस्थापकीय संचालक जयंत हुंभरवाडी यांच्याहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एफ. व्ही. मानवी हे असतील. याचप्रमाणे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशातील विविध राज्यातून अनेक विद्यार्थीही सहभागी होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. पटगुंदी यांनी दिली.


Recent Comments