माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बेळगाव जिल्हा काँग्रेसच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगाव येथील आरटीओ सर्कलजवळील काँग्रेस भवनात आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी मंत्री वीरकुमार पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्षा विनय नावलगट्टी, प्रदीप एम जी आदी मान्यवरांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांनी यावेळी बोलताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची भूमिका मांडली . त्यावेळी त्यांनी देशाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला तसेच . त्यांनी देशासाठी बलिदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा रोहिणी बाबशेठ, नगरसेविका खुर्सिदा मुल्ला, लक्ष्मी लोकरे, अकबर सडेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.


Recent Comments