Belagavi

सर्व लोक फाउंडेशनतर्फे मोहीम : जुने फोटो व देवाच्या मूर्तींचे विसर्जन

Share

सर्वलोक फाउंडेशनने जुने फोटो आणि देवाच्या खराब झालेल्या मुर्त्यांची विधिवत विसर्जन करण्याची मोहीम हाती घेतली आहे सर्व लोक फाऊंडेशनचे वीरेश बसैया हिरेमठ, दक्षिण काशीच्या कपिलेश्वर परिसरात यांनी देवदेवतांचे जुने फोटो आणि देवाच्या भग्न मुर्त्या संकलन करून त्या विधिवत विसर्जित करण्याची मोहीम राबवली.

आपल्या दैनंदिन कामासोबतच समाजाविषयी सदैव काळजी करणारे सर्वलोक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वीरेश बसैया हिरेमठ यांनी नुकतेच दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपिलेश्वर मंदिराभोवती सुमारे 500 देवतांच्या फोटोंचे संकलन करून विधीवत विसर्जन केले.
वीरेश बसैय्या हिरेमठ यांनी अनेकवेळा बेळगावच्या जनतेला झाडांखाली देवदेवतांचे खराब आणि भग्न झालेलं फोटो न टाकण्याचे अनेकवेळा आवाहन केले आहे . पण लोक पुन्हा तेच करत आहेत. आपल्या दैनंदिन कामासोबतच वीरेश बसैया हिरेमठ हे त्यांच्या टीमसह बेळगाव जिल्ह्यासाठी आदर्श आहेत.

यावेळी बोलताना वीरेश बसैय्या हिरेमठ म्हणाले की, हिंदू परंपरेनुसार देवाच्या फोटोंना जीवन असते. मंदिर, जत्रेसह ऐतिहासिक स्थळांवरून आणलेल्या देवाच्या फोटोची लोक पूजा करतात आणि घरात पूजा करतात . . तोच फोटो खराब झाल्यावर तो मंदिर परिसरात , किंवा झाडाखाली ठेवणे योग्य नाही. ते योग्य पद्धतीने विसर्जित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी योगेश देसुरकर, बाळू कणबरकर , गौरीश हिरेमठ आदी उपस्थित होते.

Tags: