दहावी परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवत यश संपादन केलेल्या बेळगावच्या तनिष्का शंकर नावगेकर या विद्यार्थिनीचा शांताई वृध्दाश्रमातर्फे सत्कार करण्यात आला.
सेंट मेरीज शाळेची विद्यार्थिनी तनिष्का नावगेकर हिने दहावी परीक्षेत 625 पैकी 620 गुण मिळविले आहेत. तिने केवळ दहावी परीक्षेत यश मिळवून प्रगती केली नसून एनसीसी मध्येही तिने यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते तनिष्काला गौरविण्यात आले आहे. तिने मिळविलेल्या यशाबद्दल आज बेळगावमधील शांताई वृध्दाश्रमाच्या वतीने सिद्धार्थ उंदरे, माजी महापौर विजय मोरे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत तनिष्काचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गेल्या आठवडाभरापासून शांताई वृद्धाश्रमात सेवा बजाविणाऱ्या आणि दहावी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास यल्लाप्पा नावगेकर, शांता नवगेकर, शंकर नावगेकर, संगीता नावगेकर, चंद्रकांत नावगेकर,ज्योतिबा कदम, रूपाली कदम, डॉ. निर्मला खोत आदी उपस्थित होते.


Recent Comments