Belagavi

डॉ. प्रभाकर कोरे यांची केएलइच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड

Share

डॉ. प्रभाकर कोरे यांची केएलइच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाली असून डॉ. बी. जी. देसाई यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

१६ मे १९८४ साली डॉ. प्रभाकर कोरे यांनी या संस्थेचा पदभार स्वीकारला होता. या संस्थेने जागतिक स्तरावर प्रगती केली असून या संस्थेशी संलग्न असणाऱ्या ३८ संस्थांपासून आज ३१० वर संस्थांची संख्या पोहोचली आहे. संस्थेसाठी आजवर डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता जे. एन. एम. सी वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचा सन्मान करण्यात आला.

Tags: