डॉ. महादेव दीक्षित आणि डॉ. माधुरी दीक्षित या दाम्पत्याला रॉयल कॉलेज ऑफ सर्जन, ग्लासगो, इंग्लंड कडून पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. महादेव दीक्षित आणि डॉ. माधुरी दीक्षित यांना अलीकडेच ग्लासगो, इंग्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स (FRCS) ची प्रतिष्ठित फेलोशिप प्रदान करण्यात आली. डॉ. एम. डी. दीक्षित यांना कार्डिओ थोरॅसिक शस्त्रक्रिया आणि डॉ. माधुरी दीक्षित यांना नेत्रविज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी गौरवण्यात आले.
डॉ. दीक्षित दाम्पत्य अनेक वर्षांपासून रुग्णसेवेचे काम करत आहेत. डॉ. एम. डी. दीक्षित कार्डियाक सर्जन आणि डॉ. माधुरी दीक्षित नेत्ररोग तज्ञ आहेत. ग्लासगोमधील ही फेलोशिप रुग्णांच्या काळजीची सर्वोच्च मानके प्रदान करण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न आणि अविचल उत्कटता दर्शवते. ही फेलोशिप मिळाल्याने दीक्षित दाम्पत्याचे रुग्णांप्रती असलेले समर्पण अधोरेखित होते.
डॉ. एम. डी. दीक्षित यांनी 1980 मध्ये बेळगावच्या जेएनएमसी कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी बायपास सर्जरीमध्ये पीएचडी पदवी मिळवली. ३३ वर्षांच्या कारकिर्दीत डॉ. एम. डी. दीक्षित यांनी 35 हजारांहून अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. आपल्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी हजारो रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे. रोबोटिक हृदय शस्त्रक्रिया करणारे दीक्षित हे कर्नाटकातील पहिले डॉक्टर आहेत.आजवर अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे.
डॉ. माधुरी दीक्षित यांनी 1984 मध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एमबीबीएस पूर्ण केले. याच विद्यापीठातून त्यांनी 1989 मध्ये नेत्रविज्ञान विषयात एमएस पदवी पूर्ण केली. 1990 मध्ये, त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमधून रेटिनल (डोळ्याच्या) आजाराचे विशेष प्रशिक्षण घेतले.डॉ. माधुरी दीक्षित यांनी आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे 28 हजार रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि दृष्टिहीनांच्या अंधकारमय जीवनावर प्रकाश टाकला आहे. तसेच ते विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे मानद सचिव असून अनेक संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
डॉ. महादेव दीक्षित आणि डॉ. माधुरी दीक्षित यांना मिळालेल्या मानद फेलोशिपबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Recent Comments