Belagavi

चिन्नाबाई खन्नी यांचे मरणोत्तर देहदान

Share

सौंदत्ती तालुक्यातील इंचल या गावच्या श्रीमती चिन्नाबाई खन्नी नायकर यांच्या अखेरच्या इच्छेनुसार त्यांच्या मृत्यूपश्चात देहदान करण्यात आले.

सौंदत्ती तालुक्यातील इंचल गावचे प्रसिद्ध केळदी संस्थांच्या नायकर स्नुषा श्रीमती चिन्नाबाई खन्नी, वय ८२ यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचा देह डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टकडे दान करण्यात आला असून डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यदर्शी डॉ. महांतेश रामण्णावर यांनी खन्नी नायकर कुटुंबीयांची कृतज्ञता व्यक्त केली. चिन्नाबाई खन्नी नायकर यांच्या पश्चात दोन मुले, ५ मुली आणि मोठा परिवार आहे.

Tags: